हिंगोलीची जुनी जलवाहिनी अचानक चालू; पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:30 AM2018-03-22T00:30:41+5:302018-03-22T00:30:41+5:30
हिंगोलीला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र नवी जलवाहिनी झाल्याने जुनी बंद होती. आज ती अचानक सुरू झाली अन् गळतीने हजारो लिटर पाणी वाया गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिद्धेश्वर-नंदगाव : हिंगोलीला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र नवी जलवाहिनी झाल्याने जुनी बंद होती. आज ती अचानक सुरू झाली अन् गळतीने हजारो लिटर पाणी वाया गेले.
या धरणातून अंदाजे १९८० च्या दशकात जलवाहिनीचे काम केलेले आहे. आता ती जागोजागी फुटली असल्याने काही वर्षांपूर्वी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सध्या नवीन वाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. जर कधी त्यात बिघाड झाली तर जुनीही वापरण्यात येते. तसाच प्रत्यय आज आला. आज अंदाजे १२ वाजण्याच्या सुमारास अचानक जुनी जलवाहिनी सुरू झाली. तसे गांगलवाडी पाटीजवळ सिद्धनदीमध्ये त्या जलवाहिनीतून असंख्य टँकर पाणी वाया गेलेले दिसत आहे. ते पाणी नदीमध्ये एखाद्या पुराच्या पाण्यासारखे दिसत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जर वाया जात असेल तर पुढे हिंगोलीला पाणी कमी दाबाने जाणार आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.