हिंगोलीच्या युवकाची मेक्सिकोत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:02 AM2018-05-12T01:02:10+5:302018-05-12T01:02:10+5:30

आयर्लंड येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले हिंगोली शहरातील जिजामातानगर येथील डॉ. विजयकुमार मुळे यांची मेक्सिको येथील जागतिक नॅशनल आॅटोनॉमस युनिव्हर्सिटी मेक्सिको या पब्लिक रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये बायोइन्फर्मेटिस्क या विषयाचे सहयोगी प्राध्यापक पदावर नेमणूक झाली आहे. मुळे १ मे २०१८ रोजी सेवेत रुजू झाले आहेत.

 Hingoli's youngest Mexicote fighter | हिंगोलीच्या युवकाची मेक्सिकोत भरारी

हिंगोलीच्या युवकाची मेक्सिकोत भरारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आयर्लंड येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले हिंगोली शहरातील जिजामातानगर येथील डॉ. विजयकुमार मुळे यांची मेक्सिको येथील जागतिक नॅशनल आॅटोनॉमस युनिव्हर्सिटी मेक्सिको या पब्लिक रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये बायोइन्फर्मेटिस्क या विषयाचे सहयोगी प्राध्यापक पदावर नेमणूक झाली आहे. मुळे १ मे २०१८ रोजी सेवेत रुजू झाले आहेत.
डॉ. विजयकुमार मुळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे एम.एस.सी. बायोटेक्नालॉजी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून एम.एस.सी. बॉयोइन्फॉर्मेटिक्स व सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रॉन्टिग अँड डॉग्नोस्टिक हैदराबाद येथून बॉयोइन्फॉर्मेटिक्स विषयात पीएच.डी. पदवी घेतली आहे. आता मेक्सिको येथे नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. मुुळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title:  Hingoli's youngest Mexicote fighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.