पवित्र ‘रमजान’निमित्त गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:49 PM2018-06-11T23:49:19+5:302018-06-11T23:49:19+5:30
पवित्र रमजान महिन्यात ईदनिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसत असून कपड्यांसह विविध प्रकारच्या साहित्याची दुकाने थाटल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पवित्र रमजान महिन्यात ईदनिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसत असून कपड्यांसह विविध प्रकारच्या साहित्याची दुकाने थाटल्याचे चित्र आहे.
हिंगोली येथील हरणचौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद साजरी करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदसाठी मुस्लीम समाज बांधवांची बाजारात झुंबड उडाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेष म्हणजे शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी दुकानांवर गर्दी पाहावयास मिळाली. शीरखुर्म्यासाठी लागणारे साहित्य यामध्ये काजू, बदाम, शेवया, फेणी, चारोळी, खारीक, खोबऱ्याची मागणी जास्त असल्याचे विक्रेते शेख बाबा तांबोली यांनी सांगितले. गतवर्षी पेक्षा खोबºयाचे दर यावर्षी वाढल्याचे तांबोळी यांनी सांगितले. हैदराबाद, नांदेड, अकोला येथील ठोक बाजारपेठेतून या मालाची खरेदी केली जाते. लहान मुलांसह मोठ्या मंडळीपर्यंत सणानिमित्त लागणाºया वस्तूंची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व साहित्य मिळत आहे. शिवाय बांगड्या खरेदीसाठी दुकानांत शहरासह ग्रामीण भागातील महिलांची गर्दी होत असल्याचे विक्रेते सय्यद जमील हाश्मी यांनी सांगितले. तसेच महिलांसाठी गळ्यातील आकर्षक दागिने, कानातील विविध प्रकारची फुले, नेलपेंट, मेंदीचे कोन असे स्टॉलही बाजारात थाटले होते.
ईदच्या शुभपर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहू नयेत, म्हणून सर्व समाजबांधव मिळून अशा कुटुंबियांना अन्नदान, कपडे तसेच विविध आवश्यक वस्तूंचे दान केले जाते. अशा प्रकारे पवित्र रमजान महिन्यात एकोप्याने आनंद साजरा केला जातो, असे शेख अन्वर तांबोली यांनी
सांगितले. तसेच रमजान महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत विविध वस्तू व शीरखुर्म्यासाठी लागाणारे साहित्य खरेदीसाठी एकच गर्दी होते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत खरेदी करणाºयांची मोठी गर्दी असते.
रमजान महिन्यात ‘रोजा’ म्हणजेच उपवास पकडले जातात. हे उपवास पाणी न पिता धरले जातात. रमजान महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच तीस दिवसांचे हे उपवास असतात.
विविध प्रकारची सुगंधी अत्तरे बाजारात दाखल
४रमजान ईद सणासाठी लागणारे विवध प्रकारची सुगंधी अत्तरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. मोगरा, रॉयल प्रोफेसी, अलीशा, आईसबर्ग या अत्तरांना जास्त मागणी असल्याचे विक्रेते अब्दूल माजिद रजवी यांनी सांगितले. ३ मिली असलेल्या अत्तराची किंमत ५० रूपये तर ८ मिली अत्तराची २५० ते त्यापुढे किंमत आहे. रमजान महिन्यात अत्तराला मोठी मागणी असते, असे रजवी म्हणाले.