हृदयविकाराच्या झटक्याने होमगार्डचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:34 AM2021-01-16T04:34:50+5:302021-01-16T04:34:50+5:30
तालुक्यातील मसोड येथील सुमित गोमाजी मोगले (वय ३५) हे कळमनुरी येथील होमगार्ड कार्यालयात होमगार्ड या पदावर कार्यरत होते. ...
तालुक्यातील मसोड येथील सुमित गोमाजी मोगले (वय ३५) हे कळमनुरी येथील होमगार्ड कार्यालयात होमगार्ड या पदावर कार्यरत होते. १४ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना त्यांना सकाळी साडेअकरा वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लगेच त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. नांदेड येथून औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा १५ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. येथील उपजिल्हा रुग्णालयात १५ जानेवारी रोजी शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सपोउपनि आर.पी. जाधव, विकी उरेवार यांनी दिली. मयत सुमित मोगले यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
फोटो नं. १५ एचएनएल ३०