कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:30+5:302021-07-08T04:20:30+5:30
हिंगोली: शहरातील जुन्या सरकारी दवाखान्यातील प्रशिक्षण सभागृहात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ‘पीसीव्ही’ व्हॅक्सिनबाबत प्रशिक्षण देण्यात ...
हिंगोली: शहरातील जुन्या सरकारी दवाखान्यातील प्रशिक्षण सभागृहात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ‘पीसीव्ही’ व्हॅक्सिनबाबत प्रशिक्षण देण्यात देऊन कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला.
७ जुलै रोजी शहरातील जुन्या सरकारी दवाखान्यातील प्रशिक्षण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यशाळेस विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्निल लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाविषयी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर, आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्निल लाळे यांनी प्रशिक्षणाबदल मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.राजेंद्र सूर्यवंशी, सहायक संचालक डॉ.मुरंबीकर, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी डॉ.मोहम्मद घोडके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ.गणेश जोगदंड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.मंगेश टेहरे यांचा, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल उपसंचालक डॉ.लाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेद्र जायभाये, तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ.नामदेव कोरडे, डाॅ.सतीश रुनवाल, डाॅ.सुनील देशमुख, डाॅ.अविनाश गायकवाड, डाॅ.सावंत, डाॅ.प्रेमानंद निखाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अमोल कुलकर्णी, सुनील मुन्नेश्वर, डी.आर. पारडकर, मुन्नाफ आदींनी केले.