५०० कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:19 AM2021-02-19T04:19:23+5:302021-02-19T04:19:23+5:30

हिंगोली : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या प्रशासनातील ५०० योद्ध्यांचा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव ...

Honoring 500 Corona Warriors | ५०० कोरोना योद्ध्यांचा सन्मान

५०० कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Next

हिंगोली : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या प्रशासनातील ५०० योद्ध्यांचा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने येथील पूर्णाकृती पुतळा परिसरात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर होते. तर आ. तान्हाजी मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती. कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता आदी ५०० कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा छाया मगर, कार्याध्यक्षा सुनीता मुळे, सचिव ज्योती कोथळकर, उपाध्यक्षा अनिता सूर्यतळ, कोषाध्यक्षा विद्या पवार यांच्यासह समितीचे मार्गदर्शक, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समितीप्रमुख सहायक आधिसेविका ज्योती पवार, रेखा शिंदे, सदस्या वंदना पांचाळ, अमिरा गावीत, हेमा पाडवी, सुषमा कदम, आरती गायकवाड, कल्पना डाके, प्रीती धबडगे यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Honoring 500 Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.