‘तुती’ लागवडीचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:37 AM2018-08-07T00:37:54+5:302018-08-07T00:38:12+5:30

वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 Horse horses after 'Tuli' cultivation | ‘तुती’ लागवडीचे वरातीमागून घोडे

‘तुती’ लागवडीचे वरातीमागून घोडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेशीम कोष उत्पादनासाठी मग्रारोहयोत तुतीच्या झाडांची लागवड करण्यास मंजुरी देता येते. तर दिवसेंदिवस शेतकºयांचा तुती लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे या शेतकºयांना लाभ मिळण्यासाठी मग्रारोहयोचा आधार घेतला जात आहे. ८0२ शेतकºयांना ८0२ एकरसाठी मान्यता दिली. यात २५ लाख ५0 हजार रोपे लावली आहेत. उद्दिष्ट १ लाख १५ हजार रोपांचे होते. यात काम चांगले केले असले तरीही तांत्रिक मंजुरी केवळ ६0३ शेतकºयांच्या ५९९ एकरलाच दिली. तर तेवढ्याही प्रस्तावांची प्रशासकीय मान्यताही झाली आहे. मात्र ४५३ शेतकºयांनाच हे आदेश मिळाले आहेत.
त्यानंतर १६९ शेतकºयांना १६९ एकरवर लागवडीसाठी कार्यारंभ आदेश दिला आहे. उर्वरितांचे प्रस्ताव धूळखात पडले आहेत. अनेक शेतकºयांनी लागवड केलेली असतानाही ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालत असल्याने शेतकºयांत नाराजी आहे. दरवर्षीच प्रशासन वरातीमागून घोडे नाचवते म्हणून अनेकांना यात काहीच लाभ मिळतही नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस शेतकºयांचा तुती लागवडीकडे कल वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकºयांच्या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन त्यांच्या समस्यां समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
जिल्हा रेशीम कार्यालय हिंगोली अंतर्गत निवड केलेल्या गावांची,तेथील शेतकºयांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये कुरूंदवाडी २२, आंबा २५, भेंडेगाव २५, वाई २४, पळशी ५२, वापटी ३२, पुयनी खु. २४, भोगाव २४, धानोरा ९, कोठारी ३०, सुनेगाव २२, सिंदगी ४०,घोडा २८,
घोळवा ३५, साळवा ३५, रूपूर २७, वारंगा २९, दांडेगाव २६, सालापूर २८, जवळा पा. १५, सांडस २५, डोंगरकडा २६, केळी २४ तसेच वडहिवरा ४२, माझोड २२, भगवती १९, हूडी २३, कांडली ३३, फाळेगाव १८ पांगरी १८ अशी गावनिहाय शेतकºयांची आकडेवारी आहे.

Web Title:  Horse horses after 'Tuli' cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.