दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:20+5:302021-01-18T04:27:20+5:30
मार्च २०२० पासून कोरोना आजारामुळे सर्वच शाळा व महाविद्यालय पूर्णपणे बंदच आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही शिक्षकांनी ...
मार्च २०२० पासून कोरोना आजारामुळे सर्वच शाळा व महाविद्यालय पूर्णपणे बंदच आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग सुरु केले होते. त्यावेळी काही विद्यार्थ्यानी ऑनलाईन वर्गाचा लाभ घेतला तर काहींना ऑनलाईन वर्ग अँड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे लाभ घेता आला नाही. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. आता परीक्षा तोंडावर येवून ठेपली आहे. आजमितीस १० वीचा अभ्यासक्रम १५ टक्के झाला आहे तर १२ वीचा अभ्यासक्रम १० टक्के जवळपास झाला आहे. वर्गामध्ये जेवढे शिक्षण चांगल्याप्रकारे घेता येते तेवढे शिक्षण ऑनलाईन वर्गामुळे होऊ शकत नाही, यामुळे पालकांना आपल्या पाल्याची चिंता वाटू लागली आहे.
दहावीचा अभ्यासक्रम
शाळा सुरु होऊन वीस दिवस पूर्ण झाले आहेत. दहावीचा अभ्यासक्रम १५ टक्के जवळपास पूर्ण झाला आहे.विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने अभ्यासक्रमही कमी केला आहे. मोजक्याच धड्यावर विद्यार्थ्याची परीक्षा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येणार आहे. मार्च महिन्यापर्यत अभ्यासपूर्ण केला जाऊ शकतो, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन व जास्तीचे वर्गही घेतले जात आहेत.
बारावीचा अभ्यासक्रम
बारावीचा अभ्यासक्रम हा १५ दिवसांपूर्वी सुरु झाला असून १० टक्के जवळपास अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. दोन ते तीन धडेही यात पूर्ण झाले आहेत. अजून अभ्यासक्रम पूर्ण होणे बाकी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जास्तीचे तासही घेतले जात आहेत. मे महिन्यापर्यत अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो, असे वाटते.
प्रतिक्रया
दहावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल. यासाठी जास्तीचे वर्गही घेतले जातील. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.वेळप्रसंगी ऑनलाईन वर्गही घेतले जातील.
-बी. जे. पतंगे, मुख्याध्यापक,
परीक्षा तोंडावर असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. वेळप्रसंगी जास्तीचे वर्गही घेतले जातील. वार्षिक परीक्षेपूर्वी अभ्यासक्रमपूर्ण केला जाईल.
-जे. जे. काळे, प्राचार्य
विद्यार्थी
१) परीक्षा तोंडावर असून अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, त्यामुळे थोडी चिंता वाटते. परीक्षेची तारीख अजून माहिती नाही. परीक्षेच्या दृष्टीने मी सध्या अभ्यास करीत आहेत. अर्धा जवळपास अभ्यासक्रम झााल आहे.
-पवन संगेवार (विद्यार्थी), हिंगोली
२)