पोळ्यासाठी लागणारे साहित्य बाजारात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:15 AM2018-09-05T00:15:59+5:302018-09-05T00:16:10+5:30
बळीराजाच्या जिव्हाळ्याचा पोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळा सणासाठी सर्जा-राजाला लागणारे साहित्य बाजारात दाखल झाले असले तरी, शेतकऱ्यांतून खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते सांगत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बळीराजाच्या जिव्हाळ्याचा पोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळा सणासाठी सर्जा-राजाला लागणारे साहित्य बाजारात दाखल झाले असले तरी, शेतकऱ्यांतून खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते सांगत होते.
वर्षभर काबाडकष्ट करून शेत पिकविणाºया बैलांना पोळ्याच्या दिवशी मोठ्या उत्साहाने सजविले जाते. मोठ्या भक्तीभावाने व जिव्हाळ्याचे नाते असल्याने बळीराजा शेतात राबणाºया बैलांची पूजाही करतो. पोळा सण अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे पोळ्यासाठी बैलाला सजविणारे विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहे. मंगळवारी हिंगोली येथील आठवडी बाजारात पोळा सणासाठी बैलांना सजविण्यासाठी घागरमाळा, बासंगि, झुल, गोंडे, कासरा, येसन, म्होरक्या, कवडीचा गाठला यासह विविध साहित्य विक्रीसाठी आले होते. परंतु बळीराजा मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या संकटात सापडत आहे. त्यामुळे पोळ्यसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मात्र भरगच्च गर्दी दिसून आली नाही. शिवाय गतवर्षीपेक्षाही यंदा शेतकºयांतून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांतून सांगितले जात होते. अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या हातची पिके गेली आहेत. अन् होता नव्हता पैसा शेतावर खर्च केला. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे.
पोळा सण जवळ येताच हिंगोलीत विविध ठिकाणी बैल सजविण्यासाठी लागणारे साहित्यविक्रीची दुकाने थाटली जातात. मात्र यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजांची गर्दी मात्र बाजारातून हरविली आहे की काय, असा प्रश्न पडत आहे.