अभ्यासिका केंद्रासाठी मानव विकासचा निधी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:23 AM2018-09-04T01:23:35+5:302018-09-04T01:23:54+5:30
विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ७२ अभ्यासिका केंद्र सध्या सुरू आहेत. येथील शिक्षकांचे मानधन व इतर खर्चासाठी १३ लाख ६ हजार ८० रूपये निधीस शासकीय मान्यता मिळाली. यापैकी १० लाख रूपये शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र शिक्षण विभागाने अद्याप ही रक्कम तालुक्याला वर्ग केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ७२ अभ्यासिका केंद्र सध्या सुरू आहेत. येथील शिक्षकांचे मानधन व इतर खर्चासाठी १३ लाख ६ हजार ८० रूपये निधीस शासकीय मान्यता मिळाली. यापैकी १० लाख रूपये शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र शिक्षण विभागाने अद्याप ही रक्कम तालुक्याला वर्ग केली नाही.
अभ्यासिका केंद्रात आवश्यक सोलर दिवे, फर्निचर, पुस्तके यासह आवश्यक साहित्य मानव विकासकडू पुरविले जाते. वरील सर्व सुविधांकरिता मानव विकासकडून संबधित तालुक्यातील अभ्यासिका केंद्राना निधी उपलब्ध करून दिला जातो. २७ आॅगस्ट २०१८ रोजी मानव विकासकडून अभ्यासिका केंद्रांतील खर्चासाठी एकूण १३ लाख ६ हजार ८० रूपये निधीस शासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी १० लाख रूपये माध्यमिक शिक्षण खात्याकडे वर्ग केले आहेत. तर २ लाख २५ हजार रूपये बालभवन विज्ञान केंद्रासाठी दिले आहेत. मात्र माध्यमिक शिक्षण विभागातील ढिसाळ कारभारामुळे मात्र हा निधी अद्याप तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला नाही. बीडीएसवर पैसेच जमा झाले नाहीत, असे सोपस्कार उत्तर देऊन संबधित कर्मचारी मोकळे होत आहेत हे विशेष. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजचे आहे. जेणेकरून शासनाचा निधी वेळेत विकासकामासाठी खर्च होईल, व विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळतील.
मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता शासनाकडून मानव विकास मिशन कार्यक्रम राबविला जातो. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मानव विकासच्या योजना राबविण्यात येतात. यातील अभ्यासिका केंद्र या योजने अंतर्गत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना घरातील अपुºया जागेमुळे अभ्यास करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अभ्यासिका केंद्र स्थापन केले आहेत. हिंगोली तालुक्यात २२, सेनगाव ३६ तर औंढा १२ केंद्रांची संख्या आहे.