रस्ता रुंदीकरणात शेकडो घरांना क्षती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:39 AM2021-01-08T05:39:04+5:302021-01-08T05:39:04+5:30

गुरुवारी दुपारी धडवाई हनुमान मंदिरापासून घरांवर खुणा आखण्याचे काम सुरू झाले होते. हरण चौक, फूल मार्केट, मेहराजुलूम चौक ते ...

Hundreds of houses damaged in road widening | रस्ता रुंदीकरणात शेकडो घरांना क्षती

रस्ता रुंदीकरणात शेकडो घरांना क्षती

Next

गुरुवारी दुपारी धडवाई हनुमान मंदिरापासून घरांवर खुणा आखण्याचे काम सुरू झाले होते. हरण चौक, फूल मार्केट, मेहराजुलूम चौक ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असा हा रस्ता आहे. आज शिवधनुष्य चौकापर्यंत नगरपालिकेचे नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, अभियंता आर.आर. दरक, नगररचनाच्या प्रिया कोकरे, किशोर काकडे आदींनी खुणा आखून देत हे बांधकाम काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उर्वरित बांधकामाच्या खुणा उद्या आखल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत विचारले असता मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे म्हणाले, शहर विकास आराखड्यानुसार हा रस्ता १२ मीटर झाल्याने हे काम त्या रुंदीचे करावे लागणार आहे. त्यासाठी मोजमाप करून खुणा आखल्या आहेत.

नगर अभियंता रत्नाकर अडसिरे म्हणाले, ज्या रुंदीचा रस्ता होणार आहे, त्यानुसार खुणा आखल्या आहेत. त्यानुसार पुढील काम केले जाणार आहे.

Web Title: Hundreds of houses damaged in road widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.