स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला, मुलाचे शिक्षण अद्यापही बाकी, हीच चिंता सतावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:39 AM2020-12-30T04:39:49+5:302020-12-30T04:39:49+5:30

हिंगोली : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला आहे. सध्या चिंता दुसरी कोणती नसून मुलाच्या शिक्षणाचीच आहे. कारण ...

If the application for voluntary retirement is given, the child's education is still pending, this is the concern | स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला, मुलाचे शिक्षण अद्यापही बाकी, हीच चिंता सतावते

स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला, मुलाचे शिक्षण अद्यापही बाकी, हीच चिंता सतावते

Next

हिंगोली : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तर दिला आहे. सध्या चिंता दुसरी कोणती नसून मुलाच्या शिक्षणाचीच आहे. कारण तो सध्या दहावी वर्गात शिक्षण घेत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. १ जानेवारी २००० रोजी मी चालक पदावर एस. टी. महामंडळात रुजू झालो. या दरम्यान विनाअपघात सेवा केली आहे. अजून माझे ७ वर्षे बाकी आहेत. सध्या माझे वय ५१ वर्षे असून ५ डिसेंबर २०१९ रोजी शासनाच्या स्वेच्छा निवृत्ती योजनेनुसार कोणाच्या सांगण्यावरुन स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला नाही तर स्वेच्छेने दिला आहे. महामंडळात माझी २० वर्षे सेवा होत आहे.

भिकाजी सखाराम सोनटक्के अर्ज दिल्यानंतर म्हणाले, हिंगोली शहरातील पंढरपूरनगर मध्ये छोटेसे घर असून घरामध्ये वडील, पत्नी आणि मुलगा आहे. १९ हजाराच्या पगारावरच तिन्ही मुलींचे लग्नही केले आहे. माझे नशिब चांगले आहे. घरात कोणत्याही सदस्यांना कोणताच आजार नाही. आता चिंता एकच आहे ती म्हणजे मुलाचे शिक्षण बाकी आहे. एकदा मुलगा स्वत:च्या पायावर उभा राहिला की, मी या चिंतेतून मुक्त होतो. घर संसार चालविण्यासाठी मी यापुढे एखादे वाहन विकत घेणार असून त्या पैशातूनच घर चालविणार आहे.

स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?

स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज अधिकारी-कमर्मचाऱ्यांनी दिल्यास त्यांचे नोकरीचे पुढील जेवढे महिने राहिले असतील त्याचे पैसे शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. आजमितीस माझे वय ५१ वर्षे आहे. मी ५ डिसेंबर रोजी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. मला पुढील तीन महिन्यांचा पगार मिळणार आहे. याचबरोबर ग्रॅच्युटी, पीएफ हेही शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणार आहे. सध्या मला २७ हजार पगार असून तीन महिन्यांचा पगार एकदाच मिळत आहे, हाच फायदा आहे.

कर्मचाऱ्याचा कोट

एस. टी. महामंडळात चालक पदावर मी सध्या कार्यरत आहे. स्वेच्छा निवृत्तीचा आलेला पैसा मी बँकेत ठेवणार आहे. हाच पैैसा मुलाच्या शिक्षणासाठी वापरणार असून त्यातून शिक्षण पूर्ण करणार आहे.

- भिकाजी सखाराम सोनटक्के

चालक, एस. टी. महामंडळ, हिंगोली

कर्मचारी पत्नीचा कोट

शासनाच्या धोरणानुसार माझ्या पतीने स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. माझ्या पतीने विनाअपघात २० वर्षे सेवा केली म्हणून शासनाने मानधन स्वरुपात कमीत कमी पाच हजार रुपये महिना द्यावा.

कर्मचारी पत्नीचा कोट

शासनाच्या धोरणानुसार माझ्या पतीने स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. माझ्या पतीने विनाअपघात २० वर्षे सेवा केली म्हणून शासनाने मानधन स्वरुपात कमीत कमी पाच हजार रुपये महिना द्यावा.

- चंद्रकला भीकाजी सोनटक्के, पंढरपूरनगर, हिंगोली

Web Title: If the application for voluntary retirement is given, the child's education is still pending, this is the concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.