‘...तर जातीयवाद पक्षांचे बी उगणवार नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:35 AM2018-11-05T00:35:32+5:302018-11-05T00:35:48+5:30
मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
राज्य साखर महासंघाच्या अध्यक्षपदी पूर्णाचे चेअरमन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा वसमतला सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमास आ. बाबाजानी दुर्राणी, आ. रामराव वडकुते, पंडितराव देशमुख, अॅड. मुंजाजीराव जाधव, राकाँ जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती राजेश पाटील इंगोले, राजू पाटील नवघरे, सभापती प्रल्हाद राखोंडे, खैसर अहेमद, रत्नमाला शिंदे, मुनीता जाधव, विनोद झंवर, सय्यद ईसरार, देवीदास पाटील, कºहाळे, नईम कुरेशी, शेख अयुब, अंबादासराव भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी दांडेगावकर म्हणाले, साखर महासंघाचे अध्यक्षपद देऊन शरद पवार यांनी वसमत तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादकांचा सन्मान केला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. शेतकऱ्यांना त्यांनी दुष्काळाची परिस्थितीची जाण ठेवा, अनावश्यक खर्च करू नका, वाढदिवस, सत्कार इ. वर उधळपट्टी करू नका, असे कळकळीचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष देविदास कºहाळे, सभापती प्रल्हाद राखोंडे, राजेश पाटील इंगोले, सय्यद इसरार, शेख अयुब खैसर, अहेमद आदींसह सत्कार समितीने परिश्रम घेतले.