दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:55 AM2023-11-24T06:55:27+5:302023-11-24T06:56:04+5:30

कर्ज परतफेडीसाठी हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ही तर शरमेची बाब : विरोधकांची सरकारवर टीका

If we do not take notice, we will come to Mumbai and sell all the organs on the streets, warn by farmer to CM | दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

लोकमत न्यूज नेटवर्क  
गोरेगाव (जि. हिंगोली) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर थेट मुंबई गाठून आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी विविध अवयव विकू. त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही बँकेचे कर्ज फेडू, असा निर्वाणीचा इशारा हिंगोलीतील काही कर्जबाजारी  शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.  

यंदा खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे शेती पिकली नाही. हाती आलेल्या तोडक्या शेतमालाला भावही मिळत नाही. पीकविमा किंवा कुठले शासकीय अनुदानही मिळाले नाही. या अनेक संकटांमुळे शेतकरी सध्या आर्यिक संकटात सापडल्याचे चित्र सध्या आहे. 

nकौटुंबिक उदरनिर्वाह भागविण्यासह सात-बारा उताऱ्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

n हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा निर्णय घेत तसे निवेदनच बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे.

‘मरता और क्या नही करता...’
पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे, शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत.
तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल शासनाला थोडेही गांभीर्य नाही. बँक कर्जापाेटी मरणाची वेळ आली असताना आत्महत्या करून बदनामीचे मरण पत्करण्यापेक्षा अवयव विक्रीतून कर्जाची परतफेड करून मरण पत्करू, असे  शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. 

हे महाराष्ट्राचे दुर्दैव, दुर्लक्ष नको : वडेट्टीवार 
nमुंबई : हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवल्याची बातमी ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केली. त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
nलाखभर रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
nशेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे पण सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Web Title: If we do not take notice, we will come to Mumbai and sell all the organs on the streets, warn by farmer to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.