चुकारे न दिल्यास आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:46 PM2018-01-08T23:46:15+5:302018-01-08T23:46:21+5:30

नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विकलेल्या तूर, उडीद, मुगाचे चुकारे त्यांना अद्याप मिळाले नाहीत. ते येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खा.राजीव सातव यांनी दिला.

 If you do not give it, then do the agitation | चुकारे न दिल्यास आंदोलन करू

चुकारे न दिल्यास आंदोलन करू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विकलेल्या तूर, उडीद, मुगाचे चुकारे त्यांना अद्याप मिळाले नाहीत. ते येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खा.राजीव सातव यांनी दिला.
सातव म्हणाले, नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकलेल्या शेतकºयांना आधीच आॅनलाईन नोंदणी, एसएमएस अशा अनेक दिव्यांतून जावे लागले. तरीही तेथे व्यापाºयांचा माल खरेदी झाला असेल तर त्यात शेतकºयांचा काय दोष? इतरांनी केलेल्या पापाचे खापर आता गरीब व गरजू शेतकºयांच्या डोक्यावर फोडले जाणार आहे काय? असा सवाल त्यांनी केला. मागील काही दिवसांपासून हे चुकारे मिळाले नसल्याचे अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे प्रसंगी यासाठी तीव्र आंदोलनाचीही तयारी असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर बोंडअळी सर्वेक्षणाचा अहवाल अद्याप सादर झाला नाही. कृषी विभागाने जिल्ह्यातील ५४ हजार हेक्टरपैकी ७५ टक्के कपासक्षेत्र बाधित झाल्याचे आढळून आल्याचे सांगितले आहे. हा अहवालही लवकर सादर झाला पाहिजे. शिवाय कर्जमाफीतील शेतकºयांना देण्यात येणाºया प्रोत्साहन अनुदानातून यंदाचे कर्ज कापून घेतले जात असल्याने याबाबत स्वतंत्र बैठक लावली जाईल. शेतकºयांना ही रक्कम मिळालीच पाहिजे यासाठी जिल्हाधिकाºयांनाही बोलणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title:  If you do not give it, then do the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.