शालेय कामकाजात अडथळा कराल तर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:55 AM2018-12-02T00:55:32+5:302018-12-02T00:56:02+5:30
विविध कारणांमुळे शाळेला कुलूप ठोकणे किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात घेऊन येणाऱ्याविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी शनिवारी दिल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबंधित मुख्याध्यापक व सेवाज्येष्ठ शिक्षकांनी कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचेही परित्रकात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध कारणांमुळे शाळेला कुलूप ठोकणे किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात घेऊन येणाऱ्याविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी शनिवारी दिल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबंधित मुख्याध्यापक व सेवाज्येष्ठ शिक्षकांनी कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचेही परित्रकात म्हटले आहे.
जिल्ह्यांतर्गत वेगवेगळ्या कारणासाठी जिल्हा परिषद शाळेच्या दैनंदिन कामात अडथळा आणला जातो. तसेच शाळा चालू असताना शाळा बंद करणे, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती, जिल्हास्तवरील शासकीय कार्यालयात आणणे, शाळांना कुलूप ठोकणे अशा विविध घटना घडत आहेत. परिणामी, दैनंदिन कामे पार पाडताना अडचणी निर्माण होतात. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शिवाय बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ चा भंग होत आहे.
याची दखल घेत आता मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी असे अडथळे करणाºयांविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना संबंधित मुख्याध्यापक, सेवाज्येष्ठ शिक्षकांना देत पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पाठवले आहे. तसेच कारवाई केलेल्या अहवालही शासन दरबारी पाठवायचा आहे. असे न केल्यास संबंधितांवरच कार्यवाही करण्यात येणार आहे.
शाळेतील समस्या सुटाव्यात या अनुषंगाने अनेकजण शाळांना कुलुप ठोकून आंदोलन करतात किंवा शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन येतात. परंतु आता असा प्रकार करणाºयाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शालेय कामकाज करण्यात येणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही अडचणी येणार नाहीत. या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पत्र काढून सूचना दिल्या आहेत.
सध्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमुळे अनेक शाळांतील पदे रिक्त होत आहेत. रिक्त पदे भरण्याची प्रक्रियाही जि. प. प्रशासनाकडून पार पाडली जाणार आहे. परंतु ही प्रक्रिया राबविताना रिक्त पदाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे
विद्यार्थ्यांचे पालक व गावकरी मंडळी आक्रमक होत आहेत. शाळेतील रिक्त पद तात्काळ भरावीत, अशी पालकांची मागणी आहे. परंतु शालेय समस्या सोडविताना शालेय कामकाजात अडथळा निर्माण करणे जमणार नाही. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
शिक्षकांची कमतरता आहे, परंतु प्रशासन प्रयत्न करीत आहे. शालेय समस्या सोडविण्यासाठी पत्रव्यवहार करावा. असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी केले आहे.