मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:33 AM2019-01-21T00:33:19+5:302019-01-21T00:33:47+5:30

माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.

 If you keep your mind calm ... | मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच...

मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.
बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अनुभव आले आहेत. सेवाकाळात कर्जवसुलीची जबाबदारी पार पाडताना रागाचा अनुभवही आला आहे. बँकेची वसुली सक्तीने किंवा राग व्यक्त करून नाही तर गोडीने व युक्तीने केली पाहिजे. विशेष म्हणजे कर्तव्य बजावताना सेवाकाळात वरिष्ठांचे राग अनुभवल्याचे सी. एल. पठाण यांनी सांगितले. तसेच रागाला प्रेमाणे उत्तर दिल्यास राग करणारे अधिकारी पश्चातापाने व्यथीत होतात. बँकेतील कर्तव्य बजावत असताना कामचुकार करणारे प्रेमाच्या गोडव्याने जवळ येवून नतमस्तक झालेले मी पाहिले आहेत. राग व द्वेष मनात न आणल्यास कुठलीही कामे लवकर होतात. शिवाय अडथळ्यांनाही थारा नसतो. प्रत्येकांनी जर स्वभावात प्रेमाची सांगड घातल्यास जीवन सुखी समाधानी बनते.
निवृत्तीनंतर अजूनही ग्रामीण शेतकरी वर्ग भेटतात. त्यावेळी त्यांचे प्रेम कुटूंबातील सदस्याप्रमाणे सुखदुखाच्या शब्दांनी भारावून जाणारे असते. त्यांच्या त्या प्रेमळ सहानुभूतीने मन आनंदून जाते. त्यामुळे प्रत्येकांनीच राग, अहंकार, द्वेष याला हद्दपार करून जीवन सुखीमय करावे. शिवाय प्रमेळ स्वभावामुळेच कर्तव्य पार पाडताना अडी-अडचणींचा सामना करावा लागला नाही.

Web Title:  If you keep your mind calm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.