वारंगा फाटा येथे अवैध रॉकेलसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:32 AM2018-10-20T00:32:47+5:302018-10-20T00:33:04+5:30
येथील एका बांधकाम शेडमध्ये अवैधरित्या ठेवलेला रॉकेलसाठा १९ आॅक्टोबर रोजी जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर व पथकाने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगा फाटा : येथील एका बांधकाम शेडमध्ये अवैधरित्या ठेवलेला रॉकेलसाठा १९ आॅक्टोबर रोजी जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर व पथकाने केली.
वारंगाफाटा येथे धाड टाकून १३ हजार लिटर रॉकेलसाठा जप्त करण्यात आला. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर आणि पोलीस प्रशासनाने शुक्रवारी ही कारवाई केली. कारवाई दरम्यान अवैधरित्या साठवणुक केलेल्या ३७ बॅरेल प्रत्येकी २०० लिटर व एका टँकमध्ये ५ हजार ६०० लिटर रॉकेल मिळून आले. याप्रकरणी नायब तहसिलदार श्रीराम पाचपुते यांच्या फिर्यादीवरून एजन्सीचा मालक विजयकुमार संजयकुमार अग्रवाल विरूद्ध आखाडा बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि व्ही. एम. केंद्रे करीत आहेत.
कारवाई दरम्यान १३ हजार रॉकेलसाठा, तसेच टँकर व रिकाम्या बॅरेल जप्त करण्यात आले आहे. एकूण ३६ लाखांच्या जवळपास मुद्देमाल असल्याची माहिती सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर, सपोनि ओमकांत चिंचोलकर, ३ मंडळ अधिकारी ५ तलाठी आदींनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानाला सील करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत कारवाई सुरूच होती. पथकाने केलेल्या धडक कारवाईमुळे मात्र अवैधरित्या रॉकेल साठवणुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.