अवैध वाळू वाहतूक; तीन टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:24 AM2018-04-11T01:24:19+5:302018-04-11T01:24:19+5:30

येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे.

 Illegal sand transport; Caught three tips | अवैध वाळू वाहतूक; तीन टिप्पर पकडले

अवैध वाळू वाहतूक; तीन टिप्पर पकडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव: येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे.
सेनगाव तहसील कार्यालयाचा गौण खनिज पथकाने मगळवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारी तिन वाहने पकडले.पथकाने एम.एच.३८ डी.९१७७,एम.एच. २६ ए.डी. ४९७९ असे दोन टिप्पर साखरा -कापडसिनगी रोडवर पकडले.तर आजेगाव परिसरात एक टिप्पर पकडले.पकडलेल्या वाहना पैकी दोन वाहने सेनगाव तहसील कार्यालयात तर एक वाहन गोरेगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले. या तिन्ही टिप्परवर तहसीलदार पाटील यांनी ९ लाख ५२८० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. वाहने पकडणाऱ्या या पथकात नायब तहसीलदार अशोक भोजणे, अव्वल कारकून बालाजी रेड्डी, लिपिक लक्ष्मण गायवाळ, तलाठी महेश सावरगाकर, राजकुमार शेळके, तलाठी बोडखे, खंदारे आदींचा समावेश होता.
नवीन नियमानुसार दंड
आता वाळूची वाहतूक करणाºया वाहनांना नव्या नियमानुसार दंड आकारणी केली जात आहे. त्यामुळे तीन लाखांचा दंड प्रतिवाहनास लागला आहे. यामुळे वाळूमाफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काहींना तर वाहनाच्या किमतीच्या अर्ध्या रकमेचा दंडच लागल्याचे सांगितले जात असून तस्करीला चाप बसणार आहे.

Web Title:  Illegal sand transport; Caught three tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.