पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या; संतप्त शेतकऱ्यांचा धार फाटा येथे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:04 PM2021-10-05T17:04:33+5:302021-10-05T17:08:51+5:30
farmer agitation in Hingoli : सिद्धेश्वर धरणातून 29 सप्टेंबर दरम्यान सोडलेल्या पाण्याने रुपुर व माथा मंडळात पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले.
औंढा नागनाथ : पिकाचे महसूलने स्वतंत्र पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान धार फाटा येथे प्रकाश चव्हाण व साहेबराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक तास रास्ता रोको आंदोलन करून मागणीचे निवेदन मंडळाधिकारी के.एन. अंभोरे यांना दिले.
सिद्धेश्वर धरणातून 29 सप्टेंबर दरम्यान सोडलेल्या पाण्याने रुपुर व माथा मंडळात पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले. याचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी मंगळवारी धारफाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन केले.
यामुळे वाहनाच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. निवेदनावर उपसरपंच प्रकाश चव्हाण साहेबराव चव्हाण सागर घनसावंत,सुभाष वाघमारे, चेअरमन पंडितराव चव्हाण, भगवान सांगळे,गणेश राठोड, देविदास सांगळे, प्रदीप राठोड, ज्ञानेश्वर माऊली,श्रीरंग राठोड, मुरलीधर नागरे, गजानन गीते, धर्मा चव्हाण,संदीप गिरे, शुभम सांगळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, एपीआय अनिल लांडगे, उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, बीट जमादार संदीप टाक, यशवंत गुरुपवार, रवी इंगोले, अमोल चव्हाण, राजकुमार सुर्वे, विनायक सुपेकर, ओमकार राजनेकर, धोंडीबा धनवे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.