आता‘डीईआसी’ केंद्रात बालकांवर तत्काळ उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:00 AM2017-12-19T00:00:33+5:302017-12-19T00:00:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : राष्टÑीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्याकरिता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्टÑीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्याकरिता जिल्ह्यामध्ये एकूण १७ वैद्यकीय पथक आहेत. पथकाद्वारे अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळेस तर शाळेतील विद्यार्थ्यांची एकदा आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान दोष आढळून आलेल्या बालकांवर आता जिल्हा रूग्णालयातील डीईआयसी केंद्रात तत्काळ उपचार करण्यात येणार आहेत.
जिल्हा रूग्णणलयात स्थापन करण्यात आलेल्या डीईआयसी केंद्रामध्ये सर्व प्रकारचे विशेषतज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर केंद्रामध्ये खालील आजाराच्या बालकांना संदर्भित करून त्यांना वेळेत उपचारासाठी सदरील केंद्राची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमांतर्गत मुख्यत: चार विशिष्ट बाबींवर भर देण्यात येणार आहे. यामध्ये जन्मत: असणारे बालकांचे व्यंग उदा. फाटलेले ओठ, तिरळेपणा, बहिरेपणा इत्यादी. बालकांमध्ये निर्माण होणारी जीवनसत्त्वाच्या तथा पोषणाअभावी होणारे आजार, बालकांना होणारे गंभीर आजार उदा. हृदयरोग, संसर्गजन्य रोग इत्यादी. बालकांच्या नैसर्गिक विकासात असणारे अडथळे उदा. मतिमंद, वाचा, श्रवण दोष तसेच उपरोक्त चार विषय तथा इतर होणाºया आजारांवर उपचार करण्यात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
बालकांचे गंभीर व दुर्धर आजार
सदर मोफत आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात येत असून यामध्ये आजारी बालकांना अंगणवाडी व शाळेतच प्राथमिक औषधोपचार देवून त्यात आढळलेल्या गंभीर व दुर्धर आजाराच्या बालकांना पुढील संदर्भासेवा ग्रामीण रुग्णालयस्तर, जिल्हा रुग्णालयस्तर व वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर देण्यात येतात. १२ डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथील नवीन डीईआयसी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सुविधा उपलब्ध झाल्याने आता बालकांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले.