हिंगोलीतील गोरेगावात शेतकऱ्यांनी घातले राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 02:34 PM2023-12-10T14:34:03+5:302023-12-10T14:34:32+5:30

‘अन्नत्याग’ आंदोलनाच्या तिसरा दिवस

In Goregaon in Hingoli, the farmers put on the Shraddha of the state government; Demand for summary debt relief | हिंगोलीतील गोरेगावात शेतकऱ्यांनी घातले राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीची मागणी

हिंगोलीतील गोरेगावात शेतकऱ्यांनी घातले राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीची मागणी

हिंगोली  : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून,  सरकार मात्र सदर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. मध्यंतरी बँककर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीचा पवित्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, १० डिसेंबर रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य शासनाचे श्राद्ध घालीत निषेध नोंदविण्यात आला आहे.

गत चार ते पाच वर्षापासून सततच्या दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकरी आत्महत्याच्या घटनाही घडत आहेत. यंदा खरीप हंगामात उत्पन्न घटीचा फटका बसला असताना पिकविमा किंवा कुठलीच शासकीय अनुदान मदतही मिळाली नाही. शेतमालाला योग्य भावही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. आमची किडनी लिव्हर, डोळे आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत आंदोलनासाठी मुंबई गाठली होती. परंतु शासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबरपासून कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांसह गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात आहेत. रस्त्यावर दूध सांडून शासनाचा निषेध नोंदवित अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. १० डिसेंबर रोजी येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता.  प्रतिमेसमोर अगरबत्ती, कापूर, मेणबत्ती दिवे जाळीत नैवेद्य फळांचा भोग चढवीत आंदोलक शेतकऱ्यांकडून राज्य शासनाचे श्राद्ध घालण्यात आले. प्रसंगी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, मदन कावरखे, अक्षय पाटील, सुनील मधुरवाड, रामेश्वर कावरखे, संजय मुळे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

सरकार संवेदनशील नाही ...

सतत दुष्काळ, उत्पन्नघटीचा सामना करावा लागत असताना आर्थिक विवंचणेत सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्याचा पर्याय निवडावा लागत आहे. याबाबत अवयव विक्रीस काढूनही शासन दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्न बाबत सरकार जराही संवेदशील नाही. त्यामुळे राज्य सरकारचे श्राद्ध घालण्यात आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: In Goregaon in Hingoli, the farmers put on the Shraddha of the state government; Demand for summary debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.