वसमतमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीस उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
By विजय पाटील | Updated: May 10, 2024 14:08 IST2024-05-10T14:08:10+5:302024-05-10T14:08:20+5:30
अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता टेम्पो घेऊन पसार झाला

वसमतमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीस उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
हिंगोली: वसमत तालुक्यातील बोराळा फाट्याजवळ भरधाव टेम्पोने एका दुचाकीस उडवले. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी आहे. जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत ते औंढा नागनाथ मार्गावरील बोराळा फाट्याजवळ १० मे रोजी सकाळी १० वाजेदरम्यान औंढाकडे जाणाऱ्या दुचाकीस नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील टेंम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मयत खंडू पोटे (वय ३०,रा गवळेवाडी ता औंढा) हा जागीच ठार झाला. तर शामराव रुस्तुम ठोंबरे (वय २८,रा सारंगवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीस नागरिकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल.
घटनास्थळी सपोनि अनिल काचमांडे, जमादार अविनाश राठोड, अजय पंडित यांच्या सह आदिंनी भेट दिली. अपघातातील टेंम्पो हा चालकाने घटनास्थळावरून भरधाव पळवून नेला असल्याने त्याचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत.