‘२ डी इको’ तपासणी शिबिराचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:59+5:302021-09-27T04:31:59+5:30

हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ‘२ डी इको’ तपासणी शिबिराचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. राष्ट्रीय ...

Inauguration of '2D Echo' Testing Camp | ‘२ डी इको’ तपासणी शिबिराचे उद्घाटन

‘२ डी इको’ तपासणी शिबिराचे उद्घाटन

googlenewsNext

हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ‘२ डी इको’ तपासणी शिबिराचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून शून्य ते १८ वर्षे वयोगटातील संदर्भित संशयित हृदयरुग्णांकरिता २५ ते २६ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात ‘२ डी इको’ तपासणी शिबिर घेण्यात आले.

यावेळी डॉ. आशुतोषसिंग, डॉ. एल. श्रीनिवास, डॉ. दिनेश, डाॅ. नागनाथ कांगणे, स्वप्निल वाळवीकर, शेख यांनी तपासणी केली. शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. एन. मोरे, डॉ. स्नेहल नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. २५ सप्टेंबर रोजी हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांतील ७७ संशयित हृदयरुग्णांची ‘२ डी इको’ तपासणी करण्यात आली. यापैकी शस्त्रक्रियेकरिता ३५ संदर्भित करण्यात आले. २६ सप्टेंबर रोजी वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील ४६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येऊन यापैकी शस्त्रक्रिया करण्याकरिता ३० संदर्भित करण्यात आले. दोन दिवसांच्या ‘२ डी इको’ तपासणीत १२३ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. हृदयशस्त्रक्रियेकरिता ६५ संदर्भित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे यांच्याकडून करण्यात येणार आहेत.

शिबिर यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील व डीईआयसी विभागातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, एएनएम व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या ‘२ डी इको’ तपासणी कार्यक्रमात डॉ. श्रीनिवास यांचा सत्कार करताना डॉ. गोपाल कदम. समवेत डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. दीपक मोरे, आदी. फोटो २५

Web Title: Inauguration of '2D Echo' Testing Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.