हिंगोलीत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:01 AM2018-06-03T00:01:35+5:302018-06-03T00:01:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला.
स्पर्धा परीक्षा केंद्र उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण होते.
बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे सह समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल्ल पट्टेबहाद्दूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय जामठीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन देविका बलखंडे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटीने यश संपादन करावे असे मत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण भाऊराव चव्हाण यांनी व्यक्त केले. तर बार्टीने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा योग्य फायदा घ्यावा असे मत बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, बार्टीच्या चाळणी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. वानखेडे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रवी पाईकराव, प्रा. जाधव यांनी परीश्रम घेतले.