शिक्षकांच्या ऑनलाइन स्पर्धांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:37+5:302021-07-10T04:21:37+5:30

या स्पर्धेचे उद्घाटन येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खा. हेमंत पाटील, ...

Inauguration of online teacher competitions | शिक्षकांच्या ऑनलाइन स्पर्धांचे उद्घाटन

शिक्षकांच्या ऑनलाइन स्पर्धांचे उद्घाटन

Next

या स्पर्धेचे उद्घाटन येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खा. हेमंत पाटील, आ. संतोष बांगर, आ. तानाजी मुटकुळे, आ. राजू नवघरे, शिक्षणाधिकारी परसराम पावसे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या ऑनलाइन स्पर्धा दि. ९ जुलै २०२१ ते ३० जुलै २०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रेरणेने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहेत. या स्पर्धांमध्ये कोरोना काळातील शैक्षणिक उपक्रम, बेस्ट एज्युकेशनल व्हिडिओ, पाठ्यपुस्तकातील कविता गायन, वैयक्तिक व सामूहिक नृत्य, मुख्याध्यापक यांच्यासाठी मी घडविलेली शाळा, ऑनलाइन गणित-विज्ञान सामान्यज्ञान स्पर्धा आणि पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धांच्या स्वरूपाचे सादरीकरण शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी केले आहे.

Web Title: Inauguration of online teacher competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.