ऑक्सिजन प्लांट व एआरटी सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:21 AM2021-07-11T04:21:02+5:302021-07-11T04:21:02+5:30
यावेळी जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ आर. बी. शर्मा, जि. प. उपाध्यक्ष ...
यावेळी जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ आर. बी. शर्मा, जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी आ. संतोष टारफे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. शिवाजी पवार, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे, डॉ. निरगुडे, डॉ. विठ्ठल करपे, डॉ. प्रकाश कोठुळे आदींची उपस्थिती होती.
हिंगोली येथे एआरटी केंद्रात औषधोपचारासाठी दैनंदिन ८० ते १०० रुग्ण येतात, ही बाब लक्षात घेता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या इमारतीत १८०३ एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या स्त्री, पुरुष व लहान मुलांना सेवा देण्यात येते. डापकू व नॅकोच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ही इमारत उभारण्यात आली आहे. आधी जिल्हा रुग्णालयात, नंतर नर्सिंग महाविद्यालयात चालणारा हा विभाग आता स्वतंत्र छताखाली आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कदम यांनी केले तर आभार डॉ. सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर चौधरी, संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदनानी, विनीत उबाळे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.