सॅक्रेड हर्टमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:32 AM2018-12-07T00:32:38+5:302018-12-07T00:33:08+5:30
येथील सॅक्रेड हर्ट इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ६ रोजी सकाळी ८.३0 वाजता करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील सॅक्रेड हर्ट इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ६ रोजी सकाळी ८.३0 वाजता करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले.
सॅक्रेड हर्ट शाळेतील हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. उद्घाटकीय सत्रास पोलीस अधीक्षक योगेशकुमार, सॅक्रेड हर्ट चर्चचे फादर मायकल डिसुझा यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षिकांची उपस्थिती होती. मुख्य प्रदर्शनी ७ रोजी भरणार असून त्यात दहावीपर्यंतची मुले नवनवीन प्रयोग सादर केले जाणार आहेत. नर्सरीपासून ते दहावीपर्यंतच्या मुलांनी या प्रदर्शनीत सहभाग घेतला आहे. विविध प्रकारच्या वस्तू, उपकरणे बनविले असून चिमुकल्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येथे पालकांनीही मोठी गर्दी केली होती. चिमुकले साहित्य व प्रयोगाबाबत माहिती देत होते. विज्ञानातील विविध नियम, स्मार्ट शहर, गाव, प्रदूषण नियंत्रण, भ्रष्टाचार नियंत्रण ते अगदी पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनचे विषय हाताळले आहेत.