भारतीय एकता-अखंडता संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:03 AM2018-12-28T00:03:40+5:302018-12-28T00:03:55+5:30

शहरातील गांधी चौक येथे २६ डिसेंबर रोजी जमीयते उलेमा- ए-हिन्दचे प्रदेशाध्यक्ष हजरत मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय एकता व अखंडता संमेलन घेण्यात आले.

 Indian Integration Integration Conference | भारतीय एकता-अखंडता संमेलन

भारतीय एकता-अखंडता संमेलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील गांधी चौक येथे २६ डिसेंबर रोजी जमीयते उलेमा- ए-हिन्दचे प्रदेशाध्यक्ष हजरत मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय एकता व अखंडता संमेलन घेण्यात आले.
यावेळी हाफीज व कारी मो. शकील यांनी कुरआन पठण करून संमेलनाची सुरूवात केली. त्यानंतर मौलाना अब्दुर्रहमान कासीर यांनी प्रेषीत मोहम्मद (सल्ललाहू अलैही व सल्लाम) यांचे स्तुतीपर अभंग प्रस्तूत केले. त्यानंतर हजरत मौलाना मुफ्ती तारीख जमील कासमी यांनी सलाम प्रस्तूत केले. जमीयतचे मराठवाडा महासचिव मौलाना अ. जलील ताबीश मिल्ली यांनी १९१९ ते आजपर्यंत देशासाठी जमीयते उलेमा-ए-हिंन्द ने केलेल्या कामांचे प्रस्तावीक प्रस्तुत केले. त्यानंतर नंतर जमाते ईस्लामी हिन्दचे शहराध्यक्ष डॉ. इकबाल जावेद यांनी विचार मांडले. पू. भदंन्त प्रा. डॉ. खेमधम्मो यांनी आपसात भेदभाव न ठेवता सर्वांनी गुन्यागोविंदाने राहण्याचे आवाहन केले. मुफ्ती तारेख जमील कासमी यांनी राष्टÑीय एकात्मतेवर मार्गदर्शन केले.
हजरत मौलाना मुफ्ती रिजवान चतुर्वेदी म्हणाले की, जगात सर्वात मोठा धर्म हा माणूसकी आहे. आणि एक दुसऱ्याबद्दल सहानुभूती व आदर असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी एकता व अखंडतेवर बोलताना शिवाजी महाराज व टिपू सुल्ताना यांचा खरा इतिहास सांगून देशातील एकता व अखंडता त्या काळात त्यांनी कशा प्रकारे जोपासली यावर उदाहरणे दिली. प्रदेशाध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी यांनी जमीयते उलेमा-ए-हिन्दने देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाची व आजपर्यंत कार्याची माहिती दिली. रमेशचंद्र बगडिया, हाजी अ. रशीद बागबान, सुरेशअप्पा सराफ, हाजी शेख नेहाल भैय्या, शेख शकील, राकाँचे शहराध्यक्ष जावेदराज, शेख आरीफ बागवान, तौफिक अहेमद खान, शेख वसीम अहेमद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शेख नईम शेख लाल, मुफ्ती जमीर कासमी, मौलाना मुबीन, हाफिज खलील, हाफिज शकील अहेमद, हाफिज अ. रशिद, हाफिज अखिल रहेमत व वजमीयते उलेमा- ए-हिन्दच्या सर्व पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Indian Integration Integration Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.