हरभऱ्यांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:18 AM2021-01-13T05:18:00+5:302021-01-13T05:18:00+5:30
आता वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिपातील सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने वाया ...
आता वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिपातील सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने वाया गेले. काही ठिकाणी जागीच कोंब फुटले तर काहींच्या सुड्या सतत पाण्याने भिजून सोयाबीन काळवंटले. काहीवर बुरशी आली, या सोबत रबी हंगामात येणारे खरिपात पेरणी झालेली तुरीचीहीच अवस्था आहे. अति ओलाव्यामुळे बऱ्याच ठिकाणी तूर वाळून गेली. फुले व फळधारणा होण्याच्या कालावधीत अपेक्षित वातावरण नसल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. खरिपातील या दोन प्रमुख पिकांनी शेतकऱ्यांचे अर्थकारणानंतर रबीवर शेतकऱ्यांची मोठी आशा आहे. मात्र, सततचे ढगाळ वातावरण, कमी थंडी, अशा बदलामुळे रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या प्रमुख पिकांची निगा राखली गेली नाही. त्यातच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकातूनही यावेळी पुरेसे उत्पन्न हाती लागण्याची आशा मावळत चालली आहे. रबी हंगामातील हरभरा पिकावरही घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.