हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:37 AM2021-01-08T05:37:07+5:302021-01-08T05:37:07+5:30

नर्सीसह हळदवाडी, वैजापूर, घोटा, पहेणी, कडती, गिलोरी, आदी परिसरामध्ये यंदा चांगली अतिवृष्टी झाल्याने हरभऱ्याचे पीक जोमात आहे. सध्या हरभरा ...

Infestation of larvae on gram | हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

Next

नर्सीसह हळदवाडी, वैजापूर, घोटा, पहेणी, कडती, गिलोरी, आदी परिसरामध्ये यंदा चांगली अतिवृष्टी झाल्याने हरभऱ्याचे पीक जोमात आहे. सध्या हरभरा पिकाला फुलांचा बहर चांगलाच लगडला आहे. मात्र, मागील तीन- चार दिवसांपासून वातावरणामध्ये अचानक बदल झाला आहे. सकाळी दाट धुके पडत असल्याने त्यामुळे हरभरा पिकाची फुले गळत असून, तसेच घाटे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकाला घाटेअळीचा प्रादुर्भाव होत आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब करावा, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा एनपीव्ही २५० मिली प्रतिहेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, फेरोमन ट्रॅप हेक्टरी १२-१५ बसविण्यात यावे, हरभरा पिकामध्ये २-३ फूट उंचीचे पक्षी थांबे लावावेत, असे आवाहन कृषी सहायक भानुदास ताटे, पंढरी डांगे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

(फोटो)

Web Title: Infestation of larvae on gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.