महागाईमुळे पेरणी करणेही झाले कठीण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:33+5:302021-06-09T04:37:33+5:30

हिंगोली: गत दोन वर्षांपासून महागाईने कळस गाठला आहे. या परिस्थितीत पेरणीचे साहित्य कसे घ्यावे, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ...

Inflation makes sowing difficult! | महागाईमुळे पेरणी करणेही झाले कठीण !

महागाईमुळे पेरणी करणेही झाले कठीण !

Next

हिंगोली: गत दोन वर्षांपासून महागाईने कळस गाठला आहे. या परिस्थितीत पेरणीचे साहित्य कसे घ्यावे, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने आता तर खरिपाची पेरणी करणेही कठीण हाेत आहे.

दोन वर्षांपासूनच महागाईने अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. बियाणांसोबत शेती औजारे घ्यावे म्हटले तर तेही घेणे सध्या परवडणारे नाही, असे शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत शेती कामाला मजूर मिळेनात. त्यामुळे शेतातील बहुतांश कामे यंत्राद्वारे करून घ्यावी लागत आहेत. यातच गत दीड वर्षांपासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केल्यामुळे शेतीतील कामे वेळेवर होईनात. आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मागच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तेव्हापासून शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकांना अतिवृष्टीची नुकसान भरपाईसुद्धा मिळाली नाही. खरीप हंगामातही अनेक शेतकरी बँकांकडे पीककर्जासाठी चकरा मारताना दिसून येत आहेत. तसेच यंत्राच्या साह्याने पेरणी करायची झाल्यास ५०० रुपये साेयाबीन बॅग पेरणी, नांगरणी १२०० रुपये, शेतात यंत्र फिरविणे ६००, डवरणी ३०० रुपये, निंदणी ५०० याप्रमाणे यंत्र मालकाला पैसे मोजावे लागत आहेत. तेव्हा शेतातील पेरणी कशी करावी, यातून पुरेशा पदरात पडेत नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया

नुकसान सहन करत दरवर्षी पेरणी करतो. परंतु, पदरात काहीच पडत नाही. महागाईमुळे तर पेरणी करणेही कठीण होऊन बसली आहे. शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.

श्रीराम मुटकुळे, हनवतखेडा

दरवर्षी शेतकरी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जात आहे. निसर्ग कोपला की मोठ्या प्रमाणात नुकसान होते. महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबडे मोडले असून आता तर बियाणे घेणे परवडेना झाले आहे.

भागवत काळे, हनवतखेडा

कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महागाईमुळे शेती करणेही आता अवघड झाले असल्याने शासनाने मदतीचा हात द्यावा.

- श्रावण ठोके, अंभेरी

Web Title: Inflation makes sowing difficult!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.