निकृष्ट कामे करणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:30 AM2021-04-24T04:30:11+5:302021-04-24T04:30:11+5:30

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात टाकण्यात आलेल्या पाइपलाइनला गॅस केटिंग वॉल करण्यात आलेली नाही, कामे सुरू करण्यापूर्वी बेंचमार्क करण्यात ...

Inquire about the officers and office bearers who are doing inferior work | निकृष्ट कामे करणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चौकशी करा

निकृष्ट कामे करणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चौकशी करा

Next

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात टाकण्यात आलेल्या पाइपलाइनला गॅस केटिंग वॉल करण्यात आलेली नाही, कामे सुरू करण्यापूर्वी बेंचमार्क करण्यात आलेले नाही, पीसीसी बेड टाकण्यात आलेले नसून आऊटलेटचे पाणी मेन चेंबरमध्ये जाण्याची व्यवस्था केलेली नाही. विशेष म्हणजे सांडपाणी शुद्धीकरणाची यंत्रणा कयाधू नदी काठावरच उभारून दूषित पाणी नदीमध्ये सोडले आहे. त्यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. निकृष्ट कामे करूनही या कामाची बिले अदा केली जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. शासनाच्या कोट्यवधीच्या निधीचे नुकसान होत असून याची सखोल चौकशी व्हावी, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराची देयके अदा करू नयेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दिली आहे.

Web Title: Inquire about the officers and office bearers who are doing inferior work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.