शहरात २०० वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:18+5:302021-09-23T04:33:18+5:30

हिंगोली : नगरपरिषद कार्यालय ते इंदिरा चौक दरम्यान २०० वाहनांची तपासणी करण्यात येऊन ६५१ चलनापोटी १ लाख ७४ हजार ...

Inspection of 200 vehicles in the city | शहरात २०० वाहनांची तपासणी

शहरात २०० वाहनांची तपासणी

Next

हिंगोली : नगरपरिषद कार्यालय ते इंदिरा चौक दरम्यान २०० वाहनांची तपासणी करण्यात येऊन ६५१ चलनापोटी १ लाख ७४ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहील, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली.

२२ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालय ते इंदिरा चौकदरम्यान वसुली मोहीम उघडली होती. ही वसुली मोहीम पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार उघडण्यात आली. मोहिमेदरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख उपस्थित होते. मोहिमेदरम्यान दुचाकी, चारचाकी, जडवाहनांची तपासणी करून लायसन्सही तपासण्यात आले. ज्या वाहनचालकांकडे जुनी थकबाकी आहे, ती थकबाकीही या मोहिमेदरम्यान वसूल करण्यात आली. या मोहिमेदरम्यान किरण चव्हाण, शिवाजी पारसकर, शेषराव राठोड, गजू राठोड, फुलाजी सावळे, रवी गंगावणे, रंगनाथ मोटे, चंद्रशेखर काशिदे, सुभाष घुगे यांनी तपासणी केली आहे.

Web Title: Inspection of 200 vehicles in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.