निवडणुकीसाठी लागणाऱ्या यंत्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:04 AM2018-10-21T00:04:54+5:302018-10-21T00:05:31+5:30
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ साठी लागणाºया एम३ ईलेक्ट्रोनिक मतदान यंत्राची (ईव्हीएमएस) १२ आॅक्टोबरपासून भारत ईलेक्ट्रोनिक्स लिमिटेड बेंगलोरचे इंजिनिअर अंकुर सैनी व त्यांच्या पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षात प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ साठी लागणाºया एम३ ईलेक्ट्रोनिक मतदान यंत्राची (ईव्हीएमएस) १२ आॅक्टोबरपासून भारत ईलेक्ट्रोनिक्स लिमिटेड बेंगलोरचे इंजिनिअर अंकुर सैनी व त्यांच्या पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षात प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात आली.
यामध्ये प्रत्येक बॅलेट युनिटला भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्यानुसार बॅलेट पेपर फिक्स करून सदरल युनिट कंट्रोल युनिटला जोडून बॅलेट युनिटचे सर्व बटण चेक करून घेण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक व्होटर व्हेरिफायबल पेपर अॅडिट ट्रेलवर प्रत्येकी ९६ डमी मदान टाकून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये मतदान यंत्रात बॅलेट युनिटला २१६४, कंट्रोलला १२५८ तर व्होटर व्हेरीफायबल पेपर अॅडीट ट्रेलवर १२५८ संख्या आली. १२५८ पैकी कंट्रोल युनिटला व व्होटर व्हेरीफायबल पेपर अॅडीट ट्रेलवर ५ टक्के म्हणजेच ६४ कंट्रोल युनिटला व व्होटर व्हेरीफायबल पेपर अॅडीट ट्रेलवर मॉक पोल घेण्यात आले. त्यापैकी १२ ईव्हीएमवर १२०० मतदान, २४ वर १ हजार आणि २८ वर ५०० या प्रमाणे मतदान आले.