‘त्या’ दोषी अभियंत्यावर कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:31 AM2018-05-18T00:31:11+5:302018-05-18T00:31:11+5:30

जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत.

 Instructions for taking action against those guilty engineers | ‘त्या’ दोषी अभियंत्यावर कारवाईचे निर्देश

‘त्या’ दोषी अभियंत्यावर कारवाईचे निर्देश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत.
हिंगोली तालुक्यातील सावा आणि चोरजवळा या गावात जलयुक्त अंतर्गत जलसंधारण विभागातंर्गत तीन आणि जिल्हा परिषदेच्या एक अशा एकूण चार सिमेंट नाला बांधकामांच्या गुणवत्तेची आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधकामांची सार्वजनीक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे यांनी रिबाउन्ड हॅमरद्वारे तपासणी केली असता, सदर कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच नाला बांधमध्ये पिचिंग आणि खोलीकरणांचे काम व्यवस्थित झालेले नाही. सदर कामे करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून त्यांचे देयक अदा करु नये, किंवा देयक अदा केले असल्यास वसूल करुन घ्यावेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या योजनांची कामे चांगल्या दजार्ची करुन न घेता शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याने संबंधीत अभियंत्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी दिले. तसेच चोरजवळा येथील शेतकºयांनी नालाबांधामध्ये बोअरवेल घेतल्याने सदर बोअरवेल जप्तीचे आदेशही जिल्हाधिकारी भंडारी यांनी दिले आहेत.
यावेळी जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुबडे, जि. प. लघुसिचंनचे कार्यकारी अभियंता येडगे, सा.बां. वि. सहायक कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे, अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, सहायक नियोजन अधिकारी द. रा. आव्हाड, जलसंधारणचे खिराडे उपस्थित होते.

Web Title:  Instructions for taking action against those guilty engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.