आंतरजातीय विवाह; १७ जोडप्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:11 AM2018-07-14T00:11:49+5:302018-07-14T00:12:15+5:30

जातीपातीच्या भिंती तोडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दरवर्षी अर्थसहाय्य केले जाते. २०१७-१८ या वर्षात जि. प. समाजकल्याणतर्फे आंतरजातीय विवाह करणाºया १७ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. चालू आर्थिक वर्षात केवळ ८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

 Inter-caste marriage; 17 help couples | आंतरजातीय विवाह; १७ जोडप्यांना मदत

आंतरजातीय विवाह; १७ जोडप्यांना मदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जातीपातीच्या भिंती तोडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दरवर्षी अर्थसहाय्य केले जाते. २०१७-१८ या वर्षात जि. प. समाजकल्याणतर्फे आंतरजातीय विवाह करणाºया १७ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. चालू आर्थिक वर्षात केवळ ८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना प्रोत्साहनपर शासनाकडून अनुदान दिले जाते. त्या अनुषंगाने हिंगोली जि. प. समाजकल्याणतर्फे गतवर्षी एकूण १७ जोडप्यांना आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. समाजात सवर्ण आणि मागासवर्गीय असा भेदभाव दूर व्हावा व या दृष्टिकोनातून शासनाने ही योजना सुरू केली आहे. समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्सहनपर रक्कम दिली जाते. पूर्वी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना १५ हजार रुपये अनुदान देय होते. यात बदल करून शासनाने रक्कमेत वाढ केली असून आता लाभाची रक्कम ५० हजार रुपये दिली जात आहे. अशा जोडप्यांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी जि.प.च्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सोबत विवाह नोंदणी दाखला, वधू-वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रती जोडणे गरजेचे आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आंतरजातीय विवाहाची नोंदणी संबंधित विवाह नोंदणी अधिकाºयाकडे असणे आवश्यक आहे. वधूचे वय १८ वर्ष आणि वराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे आदी अटी आहेत.

Web Title:  Inter-caste marriage; 17 help couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.