कपाशित गांजाचे आंतरपीक घेतले; पोलिसांच्या धाडीत तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:04 PM2020-09-12T13:04:05+5:302020-09-12T13:04:49+5:30
आसपासच्या इतरही शेतांमध्ये पोलिस पथकाने पाहणी केली
हिंगोली : जिल्ह्यातील उमरा (ता.औंढा) येथील एका शेतात कपाशीच्या क्षेत्रात आंतरपिक म्हणून केलेल्या गांजाच्या शेतीवर पोलिसांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धाड टाकली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
औंढा तालुक्यातील उमरा शिवारामध्ये बंदी असलेल्या गांजाची शेती केली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे व त्यांच्या पथकाने आज सकाळी उमरा शिवारात धडक दिली. कपाशीत आंतरपिक म्हणून गांजाची शेती केल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर आसपासच्या इतरही शेतांमध्ये पोलिस पथकाने फेरफटका मारून आणखी काही ठिकाणी असा प्रकार घडला का, यादिशेने तपास सुरू केला आहे.