लुडो खेळताना अडथळा आणला; जाब विचारल्याने तरुणास चाकूने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 12:59 PM2021-08-25T12:59:42+5:302021-08-25T13:03:10+5:30
Dispute over playing Ludo : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील घटना
वारंगा फाटा (जि. हिंगोली) : मोबाईलवर लुडो किंग गेम खेळत असताना, अडथळा आणणाऱ्यास अडवल्याने वारंगा फाटा येथे एकास चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. गंगाधर कान्होबा वाढे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर अप्पाराव शामराव जिनेवाड असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ( Interrupted playing ludo; When asked, stabbed the young man)
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे रात्री ९ वाजता गंगाधर कान्होबा वाढे (वय २५) हा काही जणांसोबत मोबाईलवर लुडो किंग हा गेम खेळत होता. या दरम्यान, अप्पाराव शामराव जिनेवाड तेथे आला. गंगाधर लुडो खेळताना अप्पाराव मध्येमध्ये करत होता. त्यास गंगाधरने शांत बस मध्ये- मध्ये करू नको, असे म्हटले. यामुळे संतापलेल्या अप्पाराव याने गंगाधरच्या पोटात चाकूने भोसकले आहे.
गंगाधर वाढे याने २३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अप्पाराव शामराव जिनेवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी अप्पाराव हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. सी. बोधनपोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख बाबर हे करीत आहेत.