२३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:52 PM2019-09-20T23:52:47+5:302019-09-20T23:54:30+5:30

आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागातील जीएनएमच्या २३ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.

 Interviews given by 3 persons for 2 vacancies; appointment orders | २३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश

२३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागातील जीएनएमच्या २३ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. २३ जागेसाठी १८३ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. १९ व २० सप्टेंबर या कालावधीत मुलाखत प्रक्रिया पार पडली असून पात्र निवड झालेल्या कंत्राटी आधिपरीचारकांना नियुक्ती देण्यात आली.
जिल्हा आरोग्य विभागातील आधिपरीचारीकांच्या रिक्त पदांअभावी कामाचा अतिरिक्त ताण इतरांवर येत असे. त्यामुळे कार्यालयीन कामे करताना विविध अडचणी समस्यां निर्माण होत. त्यामुळे आरोग्य विभागातील ही पदे भरणे गरजेचे होते. अखेर १९ व २० सप्टेंबर या दोन दिवसांत आधिपरीचारीकांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता आरोग्य विभागातील इतरत्र कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागातील कंत्राटी आधिपरीचारिका २३ रिक्त जागांसाठी राबविण्यात आलेल्या मुलाखत प्रक्रियेस २८३ जणींच्या थेट मुलाखत घेण्यात आली. आधिपरीचारिका मुलाखत भरती प्रक्रियेदरम्यान जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी गणेश जोगदंड, शंकर तावडे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, रागीनी जोशी, ज्योती पवार, सचिन करेवार, यशोदा बेले, प्रदीप आंधळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदर मुलाखती पार पडल्या. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवड झालेल्या पात्र आधिपरीचारीकांच्या नियुक्तीचे कामे सुरूच होती. सदर मुलाखत प्रक्रिया वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत इनकॅमेरा घेण्यात आली.

 

Web Title:  Interviews given by 3 persons for 2 vacancies; appointment orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.