'एक मराठा लाख मराठा' म्हणत मुंबईला जाण्यासाठी निमंत्रण पत्रिका वाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:53 PM2024-01-07T13:53:01+5:302024-01-07T13:53:21+5:30
"सत्तर वर्षापासून मराठा समाजाला मागणी करूनही आरक्षण मिळत नाही. उच्च शिक्षण घेऊनही समाजातील मुले वंचित राहत आहेत."
हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरंगी पाटील हे २० जानेवारीपासून मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी सर्वांनी मुंबईला यावे, म्हणून गावकऱ्यांनी आज वाजत गाजत निमंत्रण पत्रिका वाटप केल्या.
सत्तर वर्षापासून मराठा समाजाला मागणी करूनही आरक्षण मिळत नाही. उच्च शिक्षण घेऊनही समाजातील मुले वंचित राहत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व त्यांच्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे म्हणून पाच महिन्यांपासून मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत.
यासाठी येत्या २० जानेवारीपासून जरांगे हे मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत जरांगे हे उपोषण करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून ७ जानेवारी रोजी वसमत तालुक्यातील कौठा येथे ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका वाटप केल्या.