हिंगोलीत इज्तेमाई शादीयाँ मेळावा थाटात; २० जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:47 AM2018-02-05T00:47:20+5:302018-02-05T11:09:39+5:30

येथे जमियते-उलमा हिंदच्या पुढाकारातून ४ फेब्रुवारी रोजी रविवारी इज्तेमाई शादीया मोठ्या थाटात पार पडल्या असून यामध्ये २० लग्न संपन्न झाले आहे. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.

 Isthmai weddings were in the meeting; 20 Couples Married | हिंगोलीत इज्तेमाई शादीयाँ मेळावा थाटात; २० जोडपी विवाहबद्ध

हिंगोलीत इज्तेमाई शादीयाँ मेळावा थाटात; २० जोडपी विवाहबद्ध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : येथे जमियते-उलमा हिंदच्या पुढाकारातून ४ फेब्रुवारी रोजी रविवारी इज्तेमाई शादीया मोठ्या थाटात पार पडल्या असून यामध्ये २० लग्न संपन्न झाले आहे. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.
कुरूंदा येथे इज्तेमाई शादीया सलग दुसºया वर्षापासून घेतले जात आहे. या सोहळ्याकरीता गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केली जात होती. विविध चोख व्यवस्थासह हा सोहळा आयोजित करण्यात आला. २० लग्न या इज्तेमाई शादीयामध्ये मोठ्या थाटात पार पडले आहेत. ४ फेब्रुवारी रोजी मदीना नगर मध्ये हा एकात्मतेचा सोहळा पार पडला. मुस्लीम बांधवांसह इतर समाज बांधवांनी वधु-वरांना स्वच्छेने विविध भेट देवून एकात्मतेचा दर्शन दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात एकात्मतेचा सदभावना कुरूंद्यात पहावयास मिळते. त्याचे दर्शन इज्तेमाई शादीयामध्ये देखील पहावयास मिळाले. उत्साहात इज्तेमाई शादीयॉचा कार्यक्रम हजारो लोकांच्या व सर्वधर्माच्या लोकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला आहे.
सोहळ्याकरीता खा. अ‍ॅड. राजीव सातव, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, निरंजन पाटील इंगोले, राकाँ जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज, सभापती राजेश पाटील इंगोले, भाजपा तालुकाध्यक्ष खोब्राजी नरवाडे, बाबुराव दळवी, दत्तराव इंगोले, मुंजाजीराव इंगोले, सुभाषराव भोपाळे, रियाज कुरेशी, पं.स. सभापती चंद्रकांत दळवी, अशोकराव दळवी, सपोनि शंकर वाघमोडे, बबनराव कदम, विश्वनाथराव दळवी, माजी शिक्षण सभापती रंगराव कदम आदींची उपस्थिती होती.
जमियते-उलमा हिन्दचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मिर्झा कलीम बेग, मौलाना हाफीज ऊला कासमी, मौलाना ईतीयास कासमी, मौलाना ईसाखान कासमी, हाफीज आब्दुल रशीद, मौलाना मो. एकबाल, मौलाना अजमुता खा, मौलाना ऐजाज बेती, मौलाना निजामोद्दीन काजी, हाफीज, आब्दुल हाकीम, हाफीज साल्लार, हाफीज आब्दुल खालीक आदींची उपस्थित होते. होती.
या सोहळ्यामध्ये माजी नगराध्यक्ष अ. हाफीज, शेख फारुख हवालदार, शेख असद, खाजाभाई, कृउबा समिती सभापती राजेश पाटील इंगोले, वधुसाठी व्यापारी राजेश गवळी, सुभाषराव भोपाळे, सय्यद अहेमद मलंग, बुरखा- शेख आसद परभणी, हिंगोली एटीएम बिरादारीच्या वतीने, हिंगोली जमियते-उलमा, जिंतूर- जालना जमियते-उलमा, इंगोले, शेख फेरोज जहागीरदार, शेख शौकत, शेख सिराज आदींनी विविध वस्तू भेट म्हणून दिल्या. सोहळ्याकरीता परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जेवन, पाणी, शरबत, चहा आदी व्यवस्था होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इस्माईल हाफीज पाशा, मुफ्ती कलीम मौलाना, हाफीज आहेमद, हाफीज शफीख, मौलाना आब्दुल रहेमान, शेख फारुख, शेख असद, शेख रियाज, शेख अहेमद, इरफान कुरेशी, निसार आत्तार, रफीक मनियार, हाजी वहिद, हाजी शेनुर, उमर जहागिरदार, जावेद मनियार, फेरोज जहागीरदार, नजीब कुरेशी करीम बागवान, सलीम कुरेशी, शौकत भाई, खाजाभाई, ताहेर अलीसाब, मसूदभाई जहागीरदार, मुखीद हावलदार यांच्यासह मुस्लीम बांधवांनी व युवकांनी परिश्रम घेतले.
जमियते उलमा हिंदचे कार्य १९१९ पासून सुरू असून एकात्मता व भाईचारा हे कार्य जमियते उलमा काम करीत आहे. विविध कार्यक्रमातून हे कार्य करीत असून लोकांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न कार्य करून आवाजावा खर्च न करता व हंडा न घेता लग्न करणे आजच्या काळाची गरज असल्याचे मत जमियते- उलमाचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मिर्झा बेग यांनी व्यक्त केले. प्रत्येकांनी प्रत्येक धर्माची आदर केल्यास सद्भावना वाढेल व एकात्मता कायम राहील, भारताला पुढे जाण्यासाठी एकात्मतेची अत्यंत गरज असून तेच कार्य जमियते उलमा हिंद करीत आहे. इंग्रजाच्या विरोधात देखील जमियते उलमाने लढा दिला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत उलमांचा मोठा सहभाग होता, असे मौलाना हाफीज उला कासमी यांनी सांगितले.

Web Title:  Isthmai weddings were in the meeting; 20 Couples Married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.