फसवणूक प्रकरणातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:31 AM2018-10-20T00:31:04+5:302018-10-20T00:31:18+5:30
पुणे येथे विविध पदांवर नोकरी लावून देतो असे म्हणत बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणुक करून वेळोवेळी पैसे उकळणाऱ्या आरोपींच्या हिंगोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोघा आरोपींना १८ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पुणे येथे विविध पदांवर नोकरी लावून देतो असे म्हणत बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणुक करून वेळोवेळी पैसे उकळणाऱ्या आरोपींच्या हिंगोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोघा आरोपींना १८ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे.
वसमत तालुक्यातील कुडाळा येथील भागवत बाबुराव चव्हाण व त्यांच्या साथीदारांना राज्य राखीव बलगट क्र. २ पुणे येथे पोलीस शिपाई, सपोउपनि तसेच पोउपनि पदावर व एमआयडीसी, एमएसईबी औरंगाबाद, परभणी येथे आॅपरेटर, लिपीक यासह विविध पदावर नोकरी लावून देता म्हणून आरोपींनी या सर्वांकडून ७६ लाख ४१ हजार रूपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र दिले. फसवणुक झाल्याप्रकरणी भागवत चव्हाण यांनी वसमत ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून वसमत शहर ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे बी. मुदीराज यांनी केला. तपास पथक तयार करून आरोपींची शोध मोहिम सुरू केली. तपासादरम्यान यातील मुख्य आरोपी योगेश रामभाऊ काळे रा. अंबेजोगाई, गणेश सुभाष लोंढे रा. नगर हडपसर पुणे यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने २४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपधीक्षक बी. मुदिराज, पोउपनि नितीन केणेकर, मपोउपनि सुप्रिया केंद्रे, पोउपनि तानाजी चेरले, पेंदोर, पाचपुते, मोडक, येलगुलवार, पुंडगे, शिंदे, क्षिरसागर, ठाकरे आदींनी केली.