'पूर्णे' चे सर्वेसर्वा पुन्हा जयप्रकाश दांडेगावकर; उपाध्यक्षपदी सुनील कदम यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 03:29 PM2023-07-22T15:29:24+5:302023-07-22T15:30:25+5:30
जयप्रकाश दांडेगावकर हे सहाव्यांदा झाले पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष
- इस्माईल जाहागिरदार
वसमत:येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दांडेगावकर व आ. राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने २१ पैकी २१ जागा जिंकल्या आहेत. शनिवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी जयप्रकाश दांडेगावकर तर उपाध्यक्षपदी डॉ. सुनील कदम यांची सभासदांनी बिनविरोध निवड केली. दांडेगावकर हे ६ वेळा पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष बनले आहेत.
वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया २२ जुलै रोजी पूर्णा कारखान्यावर निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ११ वाजेदरम्यान पार पडली. अध्यक्षपदासाठी दांडेगावकर तर उपाध्यक्षपदासाठी डॉ. कदम या दोघांचे अर्ज आले होते. यावेळी दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विश्वासाला तडा जावू देणार नाही...
निवडीनंतर दांडेगावकर म्हणाले सभासदांनी शेतकरी विकास पॅनल वर विश्वास ठेवत २१ च्या २१ जागा मत्तधिक्यांनी निवडून देत विश्वास टाकला आहे.त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. 'पूर्णे' च्या विकासासाठी भविष्यात कार्य करणार आहे,असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.