बळसोंड सरपंचपदी जैस्वाल तर उपसरपंचपदी चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:31 AM2021-02-16T04:31:19+5:302021-02-16T04:31:19+5:30
बळसोंड ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पप्पू चव्हाण व शैलेष जैस्वाल यांच्या ‘जलक्रांती’ पॅनलने सर्वच्यासर्व १३ जागांवर एकतर्फी विजय संपादन केला. ...
बळसोंड ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पप्पू चव्हाण व शैलेष जैस्वाल यांच्या ‘जलक्रांती’ पॅनलने सर्वच्यासर्व १३ जागांवर एकतर्फी विजय संपादन केला. निवडणुकीच्या निकालानंतर पप्पू चव्हाण व शैलेष जैस्वाल यांनी विविध वाॅर्डात स्वखर्चाने रस्ते, नाली, विद्युत रोषणाई आदी कार्य सुरू केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी विष्णू भोजे यांच्या अध्यक्षतेखाली व तलाठी वाबळे यांच्या उपस्थितीत ग्रा.पं. कार्यालयात झालेल्या बैठकीत सरपंच व उपसरपंच पदासाठी फक्त दोनच नामनिर्देशनपत्रे आली होती. त्यामुळे सरपंच शैलेष जैस्वाल व उपसरपंच ताराबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
बळसोंड भागातील ‘साई संस्कार’मध्ये झालेल्या बैठकीत जलक्रांती पॅनलप्रमुख चव्हाण यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. नवनिर्वाचित सरपंच शैलेष जैस्वाल यांनी सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली. यावेळी आशिष वाजपेयी, ज्येष्ठ पत्रकार शरद जयस्वाल यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर बळसोंडच्या मुख्य मार्गावरून ढोलताशाच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
फोटो