अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
By यशवंत भीमराव परांडकर | Published: September 20, 2022 03:36 PM2022-09-20T15:36:05+5:302022-09-20T15:36:35+5:30
सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
केंद्रा बु. (जि. हिंगोली) सेनगाव तालुक्यातील गोजेगाव, पुसेगाव, बाभूळगाव आणि आजेगाव ही चार मंडळे अतिवृष्टीतून वगळली गेली आहेत. अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी पाण्यात उतरुन आंदोलन सुरु केले आहे.
जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांत अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली. सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टीतून वगळली गेली आहेत. दरम्यान, २० सप्टेंबर रोजी सेनगाव तालुक्यातील केंद्रा (बु) पाझर तलावावर अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन सुरू आहे.