जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी : अब्दूल सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:17 AM2021-01-13T05:17:45+5:302021-01-13T05:17:45+5:30

हिंगोली : प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी अठरा पगड जातींच्या लोकांसाठी छत्रपती शिवरायांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. माँ ...

Jijau's work is inspiring: Abdul Sattar | जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी : अब्दूल सत्तार

जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी : अब्दूल सत्तार

googlenewsNext

हिंगोली : प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी अठरा पगड जातींच्या लोकांसाठी छत्रपती शिवरायांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. माँ साहेब जिजाऊ यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आपण यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजे, असे आवाहन राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मंगळवारी १२ जानेवारी रोजी हिंगोली येथे बोलताना केले.

मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात १२ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री अर्जुन खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक माणिकराव टाकळगव्हाणर, जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरे, जि. प. सभापती फकिरा मुंडे, मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे, मालती कोरडे, राम कदम, गुड्डू बांगर, खंडेराव सरनाईक, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ढोकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे, हमीद प्यारेवाले, सुनीताताई मुळे, ज्योतीताई कोथळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष राजश्रीताई क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडित अवचार, हरिभाऊ मुटकुळे, पंडित शिरसाठ, राजकुमार वायचाळ, विश्वास वानखेडे, प्रा. जयप्रकाश पाटील, दिलीप घ्यार, प्रा. सुधाकर इंगोले, उल्हास पाटील, ज्ञानेश्वर लोंढे, श्याम सोळंके, प्रा. डॉ. मनीषा अवचार, वर्षा सरनाईक, कांताबाई कल्याणकर, रेखा देशमुख, रेखाताई पडोळे, जया सावके, वृषाली पाटील, शीतल सावके, जया पवार, माया गवळी, सुनीता सवनेकर, इंगोलेताई, सुषमाताई देशमुख, सुनीता कव्हर, मीनाक्षी शिंदे आदींनी परिश्रम घेतले. फाेटाे नं. १६

Web Title: Jijau's work is inspiring: Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.