पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कंत्राटींची नोकरी अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:31+5:302021-06-26T04:21:31+5:30
हिंगोली : कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत घेण्यात आलेल्या कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नाही, अशी माहिती राष्ट्रीय ...
हिंगोली : कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत घेण्यात आलेल्या कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नाही, अशी माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या वतीने देण्यात आली.
२३ मार्च २०१९ पासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला होता. या दरम्यान, कोणत्याही कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या लाटेत एमबीबीएस १८, बीएएमएस ७२, स्टाफ नर्सेस ८२, एएनएम ५१, इसीजी टेक्निशियन ६, एक्सरे टेक्निशियन ६, सीटी स्कॅन ४, एलटी ८, पीओ १०, डीईओ पाच, तर दुसऱ्या लाटेत एमबीबीएस १३, बीएएमएस ७७, स्टाफ नर्सेस ५५, एएनएम ५१, ईसीजी टेक्निशियन ६, एक्सरे टेक्निशियन ६, सीटी स्कॅन ४, एलटी ८, पीओ १०, डीईओ १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. कोरोना संपला असला तरी अजूनही कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले नाही. शासन ज्याप्रमाणे सूचना देईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
कंत्राटींची कोरोना सेवा...
दीड वर्षापासून कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांना औषधोपचार वेळेवर मिळावेत म्हणून शासनाने कंत्राटींची पदे भरण्याचा निर्णय घेतला. आज कोरोना ओसरत चालला असला तरी कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले नाही. शासनाच्या सूचनेप्रमाणेच त्यांना आरोग्य विभागातील विविध पदांवर नियुक्ती केली आहे. पहिल्या लाटेमध्ये २६२, तर दुसऱ्या लाटेमध्ये २४२ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते ते आजही कामावर आहेत. भविष्यात चांगले काम केल्यास शासन कंत्राटींचा विचार करील, असेही आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते. अजून तरी त्यांना कमी करण्यात आले नाही. कोरोना काळात कंत्राटी कर्मचारी शासनाच्या आदेशानुसारच नियुक्त करण्यात आले आहेत. शासनाची जशी सूचना येईल त्याप्रमाणे कंत्राटींना पुढील सूचना दिली जाईल.
- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकार, हिंगोली
जिल्ह्यात किती कंत्राटी कर्मचारी घेतले
पहिली लाट २६२, ०
दुसरी लाट २४२, ०
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या कामावर असलेले कर्मचारी २४२