तलाठीभवन बनले जुगारअड्डा केंद्र
By admin | Published: February 13, 2015 03:18 PM2015-02-13T15:18:25+5:302015-02-13T15:18:25+5:30
मोठा /गाजावाजा करून व लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले आखाडा बाळापूर येथील तलाठी भवन प्रशासकीय कामाऐवजी जुगार्यांसाठी सुरक्षित अड्डा बनला आहे.
रमेश कदम, आखाडा बाळापूर
मोठा /गाजावाजा करून व लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले आखाडा बाळापूर येथील तलाठी भवन प्रशासकीय कामाऐवजी जुगार्यांसाठी सुरक्षित अड्डा बनला आहे. दोन वर्षापासून काम पुर्ण झाल्यानंतर तलाठय़ाने अद्यापही त्याचा वापर केला नाही. भवनाचे उद््घाटन झाले नसले तरी जुगार्यांचे सुरक्षित केंद्र म्हणून त्याचा राजरोस वापर सुरू आहे.
येथील तलाठी सज्जाचे काम सुरळीत चालावे व जनतेला सुविधा मिळावी तसेच पुर्णवेळ तलाठी उपलब्ध व्हावा असा विचार करून येथे एरिगेशन कॅम्प भागात प्रशस्त तलाठी भवन बांधण्यात आले. प्रारंभी या भवनासाठी गावामध्ये जागेचा शोध घेण्यात आला. परंतु जागा न मिळाल्याने एरिगेशन कॅम्पच्या आवारात थेट बांधकाम केले. सर्व सोयीसुविधांनी सज्ज तलाठी भवन बांधण्यात आले. परंतू ज्या उद्देशासाठी ईमारत बांधली ती दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. विशेष म्हणजे सज्जाच्या तलाठय़ाने एकही दिवस इमारतीचा वापर प्रशासकीय कामासाठी केला नाही. प्रारंभी चोरून-लपून धुम्रपान करणार्या तरुणांनी या इमारतीचा वापर सुरू केला आहे. सदरील भवनाकडे कोणीच येत नाही हे लक्षात आल्याने जुगार्यांनी सुरक्षित अड्डा म्हणून या भवनाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे ही इमारत जुगारअड्डय़ाचे केंद्र बनले आहे. लाखोरूपये खर्च करून बांधलेल्या या भवनात आता राजरोसपणे जुगार खेळणे सुरू आहे. सर्वसामान्यांना तलाठी उपलब्ध होऊन या भवनात राहून तलाठय़ाने काम करावे यासाठी शासनाने लाखो रूपये खर्च केला. परंतु हे भवन अडगळीत पडले असून, जुगारी त्याचा अशाप्रकारे गैरवापर करत आहेत. तरीही संबंधित यंत्रणोची याकडे डोळेझाक आहे.