औंढ्याच्या ‘नगराध्यक्षपदासाठी’ भाजप सेनेत रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:05 PM2019-12-23T20:05:37+5:302019-12-23T20:06:31+5:30

नगरसेवकांच्या पळवापळवीची चर्चा

Just like a rope in the BJP army for the 'city president' of Aundhi | औंढ्याच्या ‘नगराध्यक्षपदासाठी’ भाजप सेनेत रस्सीखेच

औंढ्याच्या ‘नगराध्यक्षपदासाठी’ भाजप सेनेत रस्सीखेच

Next

औंढा नागनाथ : येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर २७ डिसेंबर रोजी नवीन नगराध्यक्षपदाची  निवड होणार असल्याने शिवसेना-भाजप यांच्यात या पदावरून रस्सीखेच होताना दिसून येत आहे. दरम्यान भाजपने नगरसेवकांची पळवापळवी केल्याची चर्चाही शहरात जोरात सुरू आहे. शिवसेनेने धोका दिल्यामुळे पुन्हा भाजप सक्रिय झाल्याची दिसून येत असून नवीन समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

औंढा नागनाथ नगरपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात होती. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती बिघडल्याने राज्यामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणानंतर नगरपंचायत उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रियेत शिवसेनेने सव्वा-सव्वा वर्षाचा भाजप सोबत केलेला करार तोडला आणि थेट काँग्रेससोबत युती करत भाजपला धोका दिला आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनाही ही बाब जिव्हारी लागल्याने त्यांनी २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी चंग बांधला आहे. 

सध्या नगरपंचायतमध्ये शिवसेना ५, काँग्रेस ५, भाजपा ४, राष्ट्रवादी २ आणि अपक्ष १ असे एकूण १७ नगरसेवक आहेत. नगरपंचायतमध्ये पूर्वी भाजप व शिवसेनेत सत्ता करार झाला होता. परंतु शिवसेनेने भाजपला यावेळी धोका दिल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे ४ नगरसेवक सोबत घेऊन सहलीला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे ४ व काँग्रेस-राष्ट्रवादी ४ व अजून एक नगरसेवक सोबत घेऊन येणाऱ्या २७ तारखेला भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. शिवसेनेने दिलेला राजीनामा हा केवळ नगरसेवक खूष करण्यासाठी होता; परंतु अस्तित्वात असलेली सत्ता या राजीनाम्यामुळे सध्या धोक्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विजयमाला मुळे व विष्णू जाधव या दोघांत नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा सुरू आहे. परंतु या दोघांनाही या पदापासून दूर ठेवण्याची खेळी भाजपने केली आहे. 

राजकीय परिस्थितीचा घेतला आढावा...
शिवसेनेचे आ. संतोष बांगर यांनी नगरपंचायतचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी २२ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन सध्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु येत्या २७ तारखेला सेनेचाच नगराध्यक्ष करण्यासाठी नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश दिले.त्यांनी महाआघाडीची सहकारी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सहकार्य केल्याने  पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून त्यांनी विश्वास देत शिवसेनेचाच नगराध्यक्ष होईल अशी ग्वाही दिली. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी महाआघाडीतील नगरसेवक फोडले असून भाजपचाच नगराध्यक्ष होणार असे सांगितले.

Web Title: Just like a rope in the BJP army for the 'city president' of Aundhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.